निकालानंतर गुणपडताळणी चे तपशील पुढीलप्रमाणे.
१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक ०६/०५/२०२५ ते मंगळवार, दिनांक २०/०५/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.


३) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जुन-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जुन-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुन-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ०७/०५/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

Details Regarding Verification of Marks:

  1. After the declaration of the online result of the February-March 2025 Higher Secondary Certificate (HSC - Std. XII) Examination, students who appeared for the examination may apply online for verification of marks and for obtaining photocopies of their answer sheets (excluding graded subjects), through the official website of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education: https://mahahsscboard.in. Applications may be submitted either by the students themselves or through their respective junior colleges. The terms, conditions, and detailed instructions for the same are available on the said website. Applications for verification of marks and for obtaining answer sheet photocopies can be submitted online from Tuesday, 06/05/2025 to Tuesday, 20/05/2025. The applicable fees must be paid online using Debit Card, Credit Card, UPI, or Net Banking.

  2. For applying online for re-evaluation of answer sheets of the February-March 2025 HSC (Std. XII) Examination, it is mandatory to first obtain the photocopy of the relevant answer sheet. From the date of receipt of the photocopy, the student must submit an application for re-evaluation within five working days, by following the prescribed procedure and paying the requisite fee in the prescribed format. Applications must be submitted online to the respective Divisional Board. Students seeking re-evaluation are advised to contact the concerned Divisional Board for further details.

  3. Students who appeared in all subjects and passed the February-March 2025 HSC (Std. XII) Examination shall be eligible for the Class Improvement Scheme in the subsequent three opportunities — June-July 2025, February-March 2026, and June-July 2026.

  4. For the Supplementary Examination to be held in June-July 2025, online application forms will be made available on the Board’s website starting Wednesday, 07/05/2025 for repeaters, class improvement candidates, and private candidates. A separate circular regarding this process will be issued.


            Important Dates🔷


📌Verification of Marks and Photocopy of Answer book:- 

6th May 2025 to 20th May 2025


📌Steps of applying Verification of Marks /Photocopy of Answer Book:-



Just click the following link. 
                         👇🔃🔃🔃👇


You will get this kind of interface four options. 

1 Verification of Marks.  

2. Photocopy of Answer Book. 

3. Revaluation of Answer Book.

4. Migration Certificate. 

📌2. There are four options 1 Verification of Marks, 2. Photocopy of Answer Book, and 3 Revaluation of Answer Book, 4 Migration Certificate. 

You have to select whatever you from first two. 

📌3. Once you have selected the option you have to enter your seat number and mother's Name. and other details like Address, Taluka, District, Mobile number, Email Id. etc. 

📌4. Then select the subject/Subjects for which you wanted Verification of Marks or Photocopy of Answer Book. 

📌 5. After the selection of subject you will be redirected for confirm and payments

You can apply only once, so be sure for how many subjects you are applying and all other details should be correct.  

                         

📌 6. Once payment is done you have successfully applied for verification of Marks/Photocopy of Answer Book. 

📌 7. In case of Photocopy of Answer Book you have to select how you want it. (by post, by email, by hand delivered) 

📌 8. Once you received the Photocopy of Answer Book you have get it checked by your subject teacher, if you find any difference you have to inform and upload it in the board website along with the report by the subject teacher. It has to be done within given time. 


उत्तरपत्रिका गुणपडतळणीसाठी अटी/ शर्ती व सूचना :

१) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास त्या परीक्षेतील स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त ) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website) स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. ज्या विषयांसाठी गुणपडताळणी करणे आवश्यक आहे ते सर्व विषय एकाचवेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही.

२) ऑनलाईन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरील विहित नमुन्यात प्रत्येक परीक्षेच्या वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केल्याच्या दिनांकापासून १० दिवसांपर्यंत करणे आवश्यक राहील. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक प्रत्येक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात येईल.

३) गुणपडताळणीसाठी प्रती विषयास रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking ) भरता येईल.

४) गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे अनिवार्य असेल . अपूर्ण माहिती भरलेले अर्ज, कमी शुल्क भरलेले , शुल्क न भरलेले व मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

५) गुणपडताळणी नंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यावर बंधनकारक राहील. त्यानुसार गुणपडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ संपादणूक आपोआप रद्द होईल व गुण कमी झाले तरी सुधारित संपादणूक स्विकारणे विद्यार्थ्यास बंधनकारक राहील.

६) सवलतीचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सवलतीचे गुण मिळालेल्या विषयाच्या गुणपडताळणीसाठी अर्ज केला असेल व गुण पडताळणीत विद्यार्थ्याचे अशा विषयातील गुण कमी झाल्याने तो सवलतीच्या गुणासाठी अपात्र ठरत असेल तर अशा प्रकरणी विद्यार्थ्याच्या उत्तीर्ण निकालात बदल करण्यात येईल व तो स्विकारणे बंधनकारक असेल.

७) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यानी गुणपडताळणी च्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विहित मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र संबंधित विभागीय मंडळाकडे माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळेमार्फत / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारले जाणार नाही.

८) गुणपडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळण्यास पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील.

९ ) गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुणपडताळणी शुल्क परत केले जाणार नाही मात्र गुणात बदल झालेल्या प्रकरणी विद्यार्थ्याने भरलेले शुल्क परत दिले जाईल.

१० ) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीत कोणताही बदल न होणे व उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीनंतर गुणात कोणताही बदल न होणे किंवा गुणात पाच टक्क्यांहून कमी गुणांचा बदल झाल्यामुळे उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विषयाच्या निकालात व एकूण निकालात कोणताही बदल न होणे असा असेल.

११) गुणपडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसे संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित माध्यमिक शाळेस / उच्च माध्यमिक शाळेस / कनिष्ठ महाविद्यालयास कळविण्यात येईल.त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल.

विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सूचना

१) उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/ यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in  व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in

 या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील

२) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर पप्रमाणपत्रासाठी

http://verification.mh-ssc.ac.in व इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी  http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील

३) विध्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही

४) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी .कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत

५) उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे

६) विध्यार्थ्यानी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी/शंका असल्यास (support@msbshse.ac.in) या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७,२५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

७) ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी विध्यार्थ्यानी HELP या पर्यायाची निवड करावी. उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी स्वतंत्र व्हिडीओ देण्यात आलेले आहेत

८) विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रकीयेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (status) संकेतस्थळावर पाहता येईल.आपल्या अर्जावरील प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.


Share