10 June 2022

Verification of HSC Marks.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) फेब्रुवारी/मार्च २०२४ परीक्षेच्या गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका झेरॉक्स प्रती (Verification of Marks/ Answer Book Xerox) बुधवार दिनांक २२/५/२०२४ ते बुधवार दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करता येईल. त्यासोबत ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit card/credit card/UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल. मंडळाची वेबसाईट खालील प्रमाणे.


ऑनलाईन अर्ज केल्यापासून कार्यालयीन १५ दिवसानंतर वरील लिंकवर केस नंबर प्रमाणे छायांकित प्रतीच्या अर्जाचे Status Check करण्यात यावे. वरील पोर्टलवर सदरील प्रत डाऊनलोड करून घ्यावी.

फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

Higher Secondary Certificate Examination (Std. 12th) February/March 2024 Examination Marks Verification and Answer Book Xerox Copies (Verification of Marks/ Answer Book Xerox) Online submission of application from Wednesday 22/5/2024 to Wednesday 05/06/2024 will come Along with that fee can be paid online through (Debit card/credit card/UPI/Net Banking). The website of the board is as follows.


After 15 working days from the time of online application, status check of the shaded copy of the application should be done on the above link as per the case number. The said copy should be downloaded from the above portal.

February-March 2024 Higher Secondary Certificate (Std. 12th) Examination for re-evaluation of answer sheet through online mode from the official website of the board, it is mandatory to first take a photocopy of the answer sheet and within five office working days from the day of receiving the photocopy, following the procedure of revaluation, the students should pay the prescribed fee in the prescribed form and apply online to the concerned departmental board. It will be necessary to apply according to the method. Students who want to re-evaluate the answer sheet should contact the concerned departmental board for further information.


The Students who feel that they have got less marks than what they expect, they can apply for the Verification of Marks and Photocopy of Answer Book.

You need not to go anywhere, you can apply for online from home.

            Important Dates🔷


📌Verification of Marks and Photocopy of Answer book:- 

22nd May 2024 to 5th June 2024


📌Steps of applying Verification of Marks /Photocopy of Answer Book:-



Just click the following link. 
                         👇🔃🔃🔃👇


You will get this kind of interface four options. 

1 Verification of Marks.  

2. Photocopy of Answer Book. 

3. Revaluation of Answer Book.

4. Migration Certificate. 

📌2. There are four options 1 Verification of Marks, 2. Photocopy of Answer Book, and 3 Revaluation of Answer Book, 4 Migration Certificate. 

You have to select whatever you from first two. 

📌3. Once you have selected the option you have to enter your seat number and mother's Name. and other details like Address, Taluka, District, Mobile number, Email Id. etc. 

📌4. Then select the subject/Subjects for which you wanted Verification of Marks or Photocopy of Answer Book. 

Please keep it in mind for verification of Marks you have to pay Rs. 50 per subject where only the total of Marks will be verified. 

For Photocopy of Answer Book you have to pay Rs. 400 per subject. 

📌 5. After the selection of subject you will be redirected for confirm and payments

You can apply only once, so he sure for how many subjects you are applying and all other details should be correct.  

                         

📌 6. Once payment is done you have successfully applied for verification of Marks/Photocopy of Answer Book. 

📌 7. In case of Photocopy of Answer Book you have to select how you want it. (by post, by email, by hand delivered) 

📌 8. Once you received the Photocopy of Answer Book you have get it checked by your subject teacher, if you find any difference you have to inform and upload it in the board website along with the report by the subject teacher. It has to be done within given time. 

______________________________________________

आपल्यापैकी बर्‍याच विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की, त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले आहेत. आता आपणास कोठेही जायची गरज नाही. उत्तरपत्रिका गुण पडताळणी आणि उत्तर पत्रिका छायाप्रत साठी आपण घरूनच Apply करू शकता. 

📌उत्तरपत्रिका गुण पडताळणी:-  २६ मे ते ५ जून २०२३.

📌उत्तर पत्रिका छायाप्रत:- २६ जून ते १४ जून २०२३. 

उत्तरपत्रिका गुण पडताळणी आणि उत्तर पत्रिका छायाप्रत साठी Apply कार्याच्या  स्टेप्स. 


सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 
                         👇🔃🔃🔃👇

📌 2. तूम्हाला या प्रकारचे पेज दिसेल त्यावर तीन पर्याय असतील. 

1 Verification of Marks. गुणांची पडताळणी

2. Photocopy of Answer Book. उत्तर पत्रिकेची छायांकित प्रत. 

3. Migration Certificate. स्थलांतर प्रमाणपत्र.

या पेज वर तीन पर्याय आहेत त्या पैकी पाहिल्या दोन पैकी आपल्याला हवा असलेला पर्याय निवाडा. 

📌 3. पर्याय निवडल्यावर आपले बैठक क्रमांक आणि आई चे नाव टाका आणि इतर वैयक्तीक माहिती भरा कसे, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. 

📌 4. त्या नंतर आपणास ज्या विषयाची गुण पडताळणी/छायांकित प्रत हवी आहे अशे विषय टीक करा. 

कृपया लक्षात असू द्या. गुण पडताळणी साठी 50 एका विषया साठी. आणि छायांकित प्रत 400 एका विषया साठी. खर्च लागतो. 

 📌 5. विषय निवडल्या नंतर कन्फर्म करून पेमेंट करा.

महत्त्वची सुचना:- कन्फर्म करण्याआधी पुन्हा एकदा खात्री करा संपूर्ण माहिती तपासून पहा, कारण तुम्ही फक्त एकच वेळेस अर्ज करू शकता. 

📌 6. एकदा पेमेंट यशस्वी झाले म्हणजे तुम्ही ही प्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण केली. 

📌 7. छायांकित प्रत साठी ती प्रत आपणास कशी हवी आहे हे पर्याय द्यावे लागतात.

📌 8. छायांकित प्रत मिळाल्या नंतर ती संबंधित विषय शिक्षकांकडून तपासून घ्यावयाची आहे. जर काही बदल आढळल्यास तसे बोर्डाच्या वेबसाईट वर उत्तर पत्रिकेची छायांकित प्रत आणि विषय शिक्षकांचा अभिप्राय विहित वेळेत अपलोड करायचा आहे.

*-**-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

ऑनलाईन अर्ज केल्यापासून कार्यालयीन १५ दिवसानंतर वरील लिंकवर केस नंबर प्रमाणे छायांकित प्रतीच्या अर्जाचे Status Check करण्यात यावे. वरील पोर्टलवर सदरील प्रत डाऊनलोड करून घ्यावी.


उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळण्यासाठी करावयाची कार्यपध्दती खालील प्रमाणे

📌1) http://verification.mh-hsc.ac.in                                       या वेबसाईटवर Login करणे.
📌2) Check application status येथे Click करणे.
📌3) 1.Seat no.                                     2 Mothere's Name.                   3 Submit 
📌4) Status Check येथे अंतिम रकान्यात Download असा messege असेल तेथे PDF ANSWER BOOK DOWNLOAD करण्यात यावे.


उत्तरपत्रिका गुणपडतळणीसाठी अटी/ शर्ती व सूचना :

१) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास त्या परीक्षेतील स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त ) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website) स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. ज्या विषयांसाठी गुणपडताळणी करणे आवश्यक आहे ते सर्व विषय एकाचवेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही.

२) ऑनलाईन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरील विहित नमुन्यात प्रत्येक परीक्षेच्या वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केल्याच्या दिनांकापासून १० दिवसांपर्यंत करणे आवश्यक राहील. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक प्रत्येक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात येईल.

३) गुणपडताळणीसाठी प्रती विषयास रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking ) भरता येईल.

४) गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे अनिवार्य असेल . अपूर्ण माहिती भरलेले अर्ज, कमी शुल्क भरलेले , शुल्क न भरलेले व मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

५) गुणपडताळणी नंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यावर बंधनकारक राहील. त्यानुसार गुणपडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ संपादणूक आपोआप रद्द होईल व गुण कमी झाले तरी सुधारित संपादणूक स्विकारणे विद्यार्थ्यास बंधनकारक राहील.

६) सवलतीचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सवलतीचे गुण मिळालेल्या विषयाच्या गुणपडताळणीसाठी अर्ज केला असेल व गुण पडताळणीत विद्यार्थ्याचे अशा विषयातील गुण कमी झाल्याने तो सवलतीच्या गुणासाठी अपात्र ठरत असेल तर अशा प्रकरणी विद्यार्थ्याच्या उत्तीर्ण निकालात बदल करण्यात येईल व तो स्विकारणे बंधनकारक असेल.

७) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यानी गुणपडताळणी च्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विहित मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र संबंधित विभागीय मंडळाकडे माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळेमार्फत / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारले जाणार नाही.

८) गुणपडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळण्यास पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील.

९ ) गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुणपडताळणी शुल्क परत केले जाणार नाही मात्र गुणात बदल झालेल्या प्रकरणी विद्यार्थ्याने भरलेले शुल्क परत दिले जाईल.

१० ) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीत कोणताही बदल न होणे व उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीनंतर गुणात कोणताही बदल न होणे किंवा गुणात पाच टक्क्यांहून कमी गुणांचा बदल झाल्यामुळे उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विषयाच्या निकालात व एकूण निकालात कोणताही बदल न होणे असा असेल.

११) गुणपडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसे संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित माध्यमिक शाळेस / उच्च माध्यमिक शाळेस / कनिष्ठ महाविद्यालयास कळविण्यात येईल.त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल.

विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सूचना

१) उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/ यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in  व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in

 या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील

२) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर पप्रमाणपत्रासाठी

http://verification.mh-ssc.ac.in व इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी  http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील

३) विध्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही

४) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी .कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत

५) उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे

६) विध्यार्थ्यानी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी/शंका असल्यास (support@msbshse.ac.in) या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७,२५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

७) ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी विध्यार्थ्यानी HELP या पर्यायाची निवड करावी. उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी स्वतंत्र व्हिडीओ देण्यात आलेले आहेत

८) विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रकीयेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (status) संकेतस्थळावर पाहता येईल.आपल्या अर्जावरील प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.


No comments:

Post a Comment